सोलापूर : जिल्ह्यात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात सोमवारी, १५ एप्रिल रोजी अखेर एकूण १२५ व्यक्तींनी २११ अर्ज घेऊन गेलेले आहेत, तर सोमवार, १५ एप्रिल रोजीपर्यंत ०५ व्यक्तिंनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
४२, सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी शिवाजी चंद्रकांत सोनवणे (अपक्ष) व राहुल काशिनाथ गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) या ०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे, तर सोमवारी १६ व्यक्तींनी ३६ अर्ज घेऊन गेलेले आहेत तर सोमवार रोजी पर्यंत एकूण ५४ व्यक्तींनी ९४ अर्ज घेऊन गेलेले आहेत.
४३, माढा लोकसभा मतदारसंघात सोमवारी, ०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रामचंद्र मायप्पा घुटूकडे व रमेश बारस्कर अशी त्यांची नांवे आहेत, तर सोमवारी ३२ व्यक्तींनी ५३ अर्ज घेऊन गेलेत. सोमवार अखेर ७१ व्यक्तींनी ११७ अर्ज घेऊन गेलेले आहेत.
राहुल काशिनाथ गायकवाड (वंचित) ४२ -सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघ
शिवाजी चंद्रकांत सोनवणे (अपक्ष) ४२ -सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघ
रमेश नागनाथ बारस्कर - ४३, माढा लोकसभा मतदारसंघ
रामचंद्र मायप्पा घोटकुडे - माढा