सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने , ४२ (अ.जा) लोकसभा मतदारसंघांतर्गत, २४९, सोलापूर (शहर मध्य) विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रक्रिया पार पाडावयाची असल्याने आचारसंहिता कक्षाची स्थापना होऊन नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्र. 0217-2300200 असा असून या नंबरवर आपली तक्रार नोंदवावी अथवा तहसिलदार ,उत्तर सोलापूर यांचे कार्यालय जुने कंकूबाई नेत्र रूग्णालय इमारत, सिव्हिल चौक, सोलापूर येथे संपर्क करण्याबाबतचे आवाहन अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी केलं आहे.