सोलापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selecation Board (SSB) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी, 20 मे 29 मे 2024 या कालावधीत SSB कोर्स आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे 09 मे रोजी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे.
केंद्रामध्ये एस. एस. बी कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता:- कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन ( CDSE-UPSE) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSE) पास झालेली असावी, त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले असावेत, एनसीसी ग्रुप हेडकॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉललेटर असावे किंवा एस.एस.बी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी दूरध्वनी किंवा प्रत्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे संपर्क करावा, कार्यालयीन दूरध्वनी 0217-2992366 असा आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटस्अप क्र.9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , सोलापूर यांनी केलं आहे.