Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त ग्रामीण हद्दीत विना परवाना ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास मनाई


सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ३० एप्रिल रोजी मौजे माळशिरस येथे नियोजित दौऱ्यावर येणार असून, त्याअनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याकरीता तसेच ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण जिल्हयाच्या हद्दीत, २८ एप्रिल रोजीचे 00.01 वाजलेपासून ते ३०एप्रिल रोजीचे 24.00 वाजेपर्यंत विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे मनाई आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री यांच्या, ३० एप्रिल रोजी सोलापूर  जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे तसेच विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत करण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

त्या अनुषंगाने अपर जिल्हा दंडाधिकारी मनिषा कुंभार  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश पारित केला आहे. सदरचा आदेश हा सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) हद्दीत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 188 अंतर्गत दंडनीय असेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.