Type Here to Get Search Results !

भिम जयंतीच्या निमित्ताने शनिवारी कुस्त्यांचे आयोजन; यंदा महिलापटूंचाही सहभाग

                      

     .                                                (प्रतिकात्मक छायाचित्र)

कासेगाव/संजय पवार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगांव येथे भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलंय. क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. किशोर चौधरी यांनी दिलीय.

शनिवारी, २७ एप्रिल रोजी दुपारी ०४ वाजता या कुस्त्या होणार आहेत. या कुस्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा च्या वर्षी प्रथमतः महिला कुस्तीपटूंच्या कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आलं आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २१ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र, द्वितीय बक्षीस ११ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र तर तृतीय बक्षीस ०५ हजार रुपये व ०३ हजार रुपयांची उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आल्याचेही किशोर चौधरी यांनी सांगितलंय.

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणारे डॉ. किशोर चौधरी हे विविध सामाजिक शिवजयंती, सावित्रीबाई फुले जयंती, अन्य महापुरुषांच्या जयंतीमध्ये सातत्याने गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. या कुस्ती स्पर्धेसाठी या भागातील अनेक मान्यवरांना तसेच कुस्ती मल्लांना निमंत्रित केल्याचं किशोर चौधरी यांनी सांगितलं आहे.