Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने या मार्गावरील वाहतूक राहील बंद : यशवंत गवारी


सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष प्रचारासाठी सोमवारी, २९ एप्रिल रोजी होम मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणांस्तव होम मैदान परिसरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांकरीता सभा संपेपर्यंत बंद राहतील,  अथवा वळविण्यात येणार असल्याचं सहा. पोलीस आयुक्त (वाहतूक) यशवंत गवारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविलंय.

शिवछत्रपती रंगभवन चौक ते डफरिन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकीपर्यंत सकाळी ०८.०० वा ते सभा संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पुर्णपणे बंद राहणार आहे.

प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणांस्तव विमान तळ-आसरा चौक, महिला हॉस्पीटल, महावीर चौक-आर.डी.सी.-कार्नर-सात रस्ता-वोडाफोन गॅलरी- शिवछत्रपती रंगभवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक तसेच या रस्त्याला जोडणारे रस्ते सोमवारी, २९ एप्रिल रोजी दुपारी १३.३० वाजलेपासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे. 

नागरिकांनी आपली गैरसोय होऊ नये, यासाठी या मार्गावर येणे टाळावे, अथवा अन्य मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असंही आवाहन सहा. पोलीस आयुक्त (वाहतूक) यशवंत गवारी यांनी त्या पत्रकान्वये केलंय.