Type Here to Get Search Results !

जबर मारहाण; ०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर : हात उसने पैसे घेतल्याचे कारणावरून झालेल्या बाचाबाचीत वाहीद जहागीरदार याच्यासह ०६ जणांनी तरुणास जबर मारहाण करून गंभीर जखमी केलंय. ही घटना कुमठा नाका चौकात गुरुवारी रात्री ११ वा. च्या सुमारास घडलीय. मोसीन ऊर्फ वसीम अब्दुल करीम काझी (वय-३० वर्षे) असं जखमीचं नांव आहे. त्याच्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात ०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, न्यु पाच्छा पेठ, गुलाम पैलवान हॉल जवळील रहिवासी मोसीन ऊर्फ वसीम काझी यानं हात उसने पैसे घेतले होते. त्यातूनच हा प्रकार घडला. त्या पैशाच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीत वाहीद जहागीरदार व इतरांनी लाकडी स्टॅम्प- बांबू व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने तो गंभीर दुखापत झालीय. यावेळी त्यास शिवीगाळी-दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.

जखमी मोसीन काझी याच्या फिर्यादीनुसार वाहीद जहागीरदार, साहिल शेख, टिपु शेख, इरफान शेख आणि अन्य दोन अनोळखी तरुणाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भादवि ३२६, ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.