सोलापूर : रमजान ईद चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवारी, ०३ मार्च रोजी सायंकाळी ०४ वा. पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर. टी. ओ. चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, शहर काझी, मुस्लीम बांधवांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीची प्रस्तावना श्रीमती डॉ. दिपाली काळे (पोलीस उप आयुक्त :गुन्हे) यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या सुचना मांडल्या. त्यानंतर या सुचनांचे संबंधित महानगर पालिका अधिकारी यांनी या कामाची रुपरेषा पाहून समस्या सोडविण्यात येतील, असं सांगितले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, अजित बोऱ्हाडे (पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), श्रीमती डॉ. दिपाली काळे (पोलीस उप-आयुक्त : गुन्हे), विजय कबाडे (पोलीस उप आयुक्त : परीमंडळ), अशोक तोरडमल (सहाय्यक पोलीस आयुक्त : विभाग-१), अजय परमार, (विभाग-२), यशंवत गवारी, (वाहतुक शाखा), श्रीमती. प्रांजली सोनवणे (गुन्हे शाखा), तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील नगर अभियंता श्रीमती सारिका अकुलवार, आर. टी. ओ. श्रीमती अर्चना गायकवाड, महावितरण अति. कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी-पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधू उपस्थित होते.