सोलापूर : जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, कोंडी येथील प्रशालेने एम टी एस ऑल्मपिड परिक्षेत घवघवीत यश मिळवले. प्रशालेतील ०८ विदयार्थी या परिक्षेत बसले होते. त्यातील कु. श्रावणी राहूल वाघचवरे ही इयत्ता ०७ वी तील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात १० वी तर कु. तेजस्विनी श्रीराम भोसले इयत्ता ०४ तील विद्यार्थ्यांनी ही जिल्हयात १३ वी आली.
प्रशालेचे संस्थापक गणेश नीळ यांनी यशस्वी विदयार्थीनींचा पुस्तक देऊन सत्कार केला. मार्गदर्शक शिक्षक रवि कोतकुंडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना औरादे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे सहशिक्षक वैभव मसलकर, शीतल कांबळे,अजितकुमार जाधव, करिश्मा शेख, दिलिप भोसले, संकेत मोरे, विश्वनाथ उपाध्ये, सिद्धराम नीळ आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवि कोतकुंडे यांनी केले तर शीतल कांबळे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.