सोलापूर : शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला.
मागील दोन टर्ममध्ये भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकासाचं काम केलेलं नाही. भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे यावेळी सोलापूरची लेक म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने करण्यात आला.
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी, ०३ मार्च रोजी प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच आजपासून प्रणिती शिंदे यांचा प्रचार सुरू करणार असल्याचेही रिक्षा चालकांनी स्पष्ट केले.
'मुद्द्याचं बोला ओ' या अभियानांतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन समस्याही मांडल्या.