Type Here to Get Search Results !

हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री काळजापूर मारुती मंदिरात अबाल-वृद्ध भाविकांची गर्दी


सोलापूर : संकटमोचक बजरंगबली श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला श्री काळजापूर मारुती मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी अबाल-वृद्ध भाविकांची एकच मांदियाळी होती. 

श्री हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई आणि केळीच्या पांनाची सजावट करण्यात आली होती. यामुळे सारा परिसर प्रसन्नमय व चैतन्यमय झाला होता, तसेच संस्कार भारतीच्या वतीने आकर्षक असं गदाचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून सादर केले होते. 

श्रींना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून भाविकांनी दर्शन घेतले यावेळी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. श्रींचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच मंदिराबाहेर देखील भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. यावेळी मंदिर परिसरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मंदिरात जय श्रीराम जय बजरंग बली च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आलं.