Type Here to Get Search Results !

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रचार फेरी


सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासपा, रयत क्रांती संघटना, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील प्र. क्रं. ४ मधील प्रचार फेरी मंगळवारी २३ एप्रिल रोजी सकाळी १० वा.महात्मा बसवेश्वर पुतळा, कोंतम चौक येथून निघाली. ही प्रचार फेरी क्षत्रिय गल्ली, कुंभार वेस, सराफ बाजार मधला मारुती, भुसार गल्ली, महादेव गल्ली येथील प्रमुख बाजार पेठेतून व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला..



याप्रसंगी माजी नगरसेवक संजय कोळी, विनायक विटकर, राजकुमार काकडे, अजित गायकवाड, देविदास चेळेकर, गणेश साखरे, सचिन कुलकर्णी, अमर पुदाले, शिवराज पवार, मिरजकर बंधू, श्रीशैल शेटे, अनुप वेर्णेकर, प्रेम भोगडे, नागेश भोगडे, बंटी कुमणे, मनोज मलकुनाईक, सुनिल शरणार्थी, गणेश भूमकर, आनंद बंकापूर, प्रकाश पवार, रोहन बंकापूर, सचिन पवार , यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.