या घटनेची अधिक माहिती अशी की, नई जिंदगी स्वागत नगरालगतच्या किरण नगरातील रहिवासी सैफन मोदीन शेख याला त्याची पत्नी सौ. यास्मिन फिर्यादी यांनी पत्नी यास्मीन (रा. पाथरुट चौक, सोलापूर) हिने तिचा पती सैफन याला मला तू ७० हजार रुपये कधी देणार आहेस, मला देणेकऱ्यांचे वारंवार फोन येत आहेत, तु मला आज पैसे नाही दिले तर मी तुझ्या घरी येऊन गोंधळ घालून तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, तुला आज काय ते दाखवते, अशी धमकी दिली.
हा विषय धमकीपुरताच न राहता, पत्नीने पतीच्या कानाखाली वाजविले. त्यामुळे सैफनने चिडून आजुबाजुला कोणीही नसल्याचे पाहून स्वतःच्या डावे कंबरेला खोचून ठेवलेला चाकूबाहेर काढून पत्नी यास्मीन हिचे उजवे गालावरुन मानेवर वार केला. त्यानंतर चाकुने तिचे पोटावर डाव्या बाजूस दुसरा वार केला, त्याने रक्ताळलेल्या चाकूने पत्नी यास्मीन हिचे दोन्ही हातांच्या मनगटांच्या नसा कापल्या.
ती मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर सैफन शेख रक्तात भिजलेल्या चाकूसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर हजर झाला. त्यानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यास फिर्यादी करून पत्नी सौ. यास्मिन (वय-४० वर्षे) हिच्या निर्दयी हत्येप्रकरणी सैफन मोदीन शेख (वय-४९ वर्षे) याच्याविरुध्द भादवि ३०२, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यात सैफन याला अटक केल्यानंतर, चौकशीत सौ. यास्मिन त्याची पहिली पत्नी होती. त्यानंतर त्यानं २ निकाह केल्याची माहिती पुढं आली असल्याचं सांगण्यात आलंय. त्यास न्यायालयापुढं हजर केल्यावर, न्यायालयानं तपासकामी ३ दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिवे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.