सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने भारतरत्न डॉ. आंबेडकर मानवंदना देण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या राज्य उपाध्यक्ष वैशाली सागर उबाळे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राचार्य डॉ. एस. के. गायकवाड, संजय सदाफुले, रणखांबे, कुमठा येथील सर्व महिला मंडळ विजापूर नाका येथील बचत गटाच्या सर्व महिला प्रकाश कांबळे भंडारे गुरपा गायकवाड बनसोडे सर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देऊन मनवंदना देण्यात आली. त्याचबरोबर संविधान बचाव रॅली ही काढण्यात आली. त्यामध्ये संविधान बचाव, देश महासत्ता बनाव, देश बचाव असे नारे ही देण्यात आले.
रॅलीच्या माध्यमाने लोकांना संविधान बचाव, असा संदेश समता सैनिक दलाच्या वतीने देण्यात आला, असेच संदेश लोकांपर्यंत पोहोचले तर संविधान वाचाल तर तुम्ही पण वाचाल असाही संदेश देण्यात आला. मानवंदना देऊन सांगता करण्यात आली.