सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त जी. एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदा ही पारंपारिक वाद्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करुन काढण्यात आली.
या वेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त बोराडे, जी.एम.संस्थेचे संस्थापक बाबासाहेब वाघमारे, जी. एम. संस्थेचे आधारस्तंभ दत्ता भाऊ वाघमारे, उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे, पप्पु गायकवाड, राजु हौशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मिरवणुकीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मानवासह पशू- पक्षांना, प्राण्यांना देखील संविधानाच्या माध्यमातून संरक्षण दिलं आहे, हा संदेश देणारा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपल्या चोचीमध्ये घेऊन पृथ्वीवर फिरत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे महत्त्व जगाला सांगत आहे, असा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला आहे.