सोलापूर : कर्नाटकातील सौंदत्ती इथं कु. नेहा हिची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आलीय. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी श्री वीरशैव लिंगायत समाज मंडळ, सोलापूर च्या बैठकीत एकमताने करण्यात आलीय. सोमवारी, २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, पोलीस यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
कर्नाटकातील हुबळी पोस्ट सौंदती येथील कु. नेहा हिची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केलीय. या हत्त्येचा जाहीर निषेध करण्यासाठी श्री वीरशैव लिंगायत समाज मंडळ सोलापूर यांच्यावतीने निषेध सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये नेहा यांच्या फोटोस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेमध्ये तिच्या हत्तीस जबाबदार असलेल्या आरोपीस कठोर शासन म्हणून फाशीची शिक्षा द्यावी, असं मत श्री वीरशैव लिंगायत समाज मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विरशैैव लिंगायत प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी केलंय.
यावेळी धरणे सर, सिद्धया स्वामी-हिरेमठ, सुदीप चाकोते, श्रीशैल बनशेट्टी, सचिन कुलकर्णी, मंगेश स्वामी, सुनील शरणार्थी, कैलास जेऊरे आणि अशोक नागणसुर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.