कासेगांव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं गांवच्या मुख्य वेशीजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनर ला शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी सकाळपूर्वी अज्ञातांनी फाडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आलंय. या कृतिवर अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
हा निंदनीय प्रकार समजल्यावर अमरभिम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व आंबेडकरप्रेमी ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कृतीचा निषेध व्यक्त केलाय. ज्यांनी या बॅनरची विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांनी पुढं येऊन माफी मागावी, असं महेश गायकवाड यांनी म्हटलंय.
यावर पोलीस अधीक्षकांकडं निवेदन देण्यात येणार असून अशा विघ्नसंतोषी मंडळींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचंही काही पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.