Type Here to Get Search Results !

रूग्णसेवक आनंद गोसकी यांच्या प्रयत्नामुळे संकटातील कुटुंबाला मोठा आधार


सोलापूर : मृत्यू परमेश्वराची इच्छा... ! असं मानणारी माणसं दु:खाच्या क्षणी सांत्वनपर दिलासा देताना, सहजच बोलून जातात, त्यापूर्वी डॉक्टर रुग्णाला वाचविण्याचे कसोशीनं प्रयत्न करतात. त्यातूनही रुग्ण दगावला तर संपूर्ण बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात न देण्याचे कटूक्षणही काहींच्या वाट्याला येतात. अशाचं संकटात सापडलेल्या कुटुंबाला एक लाखाहून अधिक रक्कमेची सवलत मिळणं, रुग्णसेवक आनंद गोसकी यांच्या प्रयत्नामुळं शक्य झालंय.

पुणे येथील एका टोलेजंग हाॅस्पीटलमध्ये सोलापुरातील रामचरण या ०८ वर्षीय बालकावर ब्लड कॅन्सर या दुर्धर आजारावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचं निधन झाले. त्यावेळी त्या हाॅस्पिटलने ०१ लाख १० हजार  रूपये भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात मिळणार नसल्याची भूमिका घेतली.

अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबापुढं आता काय करायचं, हा यक्ष प्रश्न होता. दुःखाच्या खाईत असलेल्या कुटुंबाचे नातेवाईक सामल यांनी रात्री ११ च्या दरम्यान रूग्णसेवक आनंद गोसकी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा बाका प्रसंग सांगितला.

त्यावेळी आनंद गोसकी यांनी तात्काळ संबधित हाॅस्पिटल प्रशासनाला विनंती करून दु:खात असलेल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला. रूग्णसेवक आनंद गोसकी यांच्या प्रयत्नामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या त्या कुटुंबाला एक लाख दहा हजार रूपयांची सुट मिळवून दिलीय. त्यांचा हा प्रयत्न त्या कुटुंबासाठी प्रचंड आधाराचा असल्याची भावना व्यक्त केलीय.

अधिक माहितीसाठी - .आनंद गोसकी - ९५९५१५२५८९