सोलापूर : जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निवडणूक कर्तव्यासाठी आदेशित सर्व कर्मचारी यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणेबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने ४२, सोलापूर लोकसभा मतदारासंघ २५०, अक्कलकोट मतदारसंघातर्गत अक्कलकोट तालुक्यामध्ये शुक्रवारी, १९ एप्रिल व शनिवारी, २० एप्रिल या दिवशी मंगरूळे प्रशाला अक्कलकोट या ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
हे प्रशिक्षण सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० या वेळेत दोन दिवसामध्ये १२ सत्रामध्ये आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षणाचे आदेश केंद्रप्रमुखामार्फत वितरीत करण्यात आले आहेत, तरी निवडणूक कर्तव्यासाठी आदेशीत सर्व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणास उपस्थित रहावे व ईव्हीएम व्हीव्हीपॅट चे बारकावे समजून घ्यावे. जेणेकरून मतदाना दिवशी मतदान यंत्र हाताळताना चुका होणार नाहीत. असे आवाहन अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अक्कलकोट यांचे वतीने करण्यात आले आहे.