Type Here to Get Search Results !

पत्रकारिता क्षेत्रातील योगदान... ! रोहित पाटील यांना डॉक्टरेट


सोलापूर : टाइम्स नाउचे पत्रकार रोहित पाटील यांना वर्ल्ड पिस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलीय. राजधानी दिल्लीत आयोजित एका शानदार सोहळ्यात रोहित पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टरेट ही पदवी मिळालीय.

बांगलादेशचे मंत्री शबन महमूद ,अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू डीएसपी हरियाणाच्या नेहा राठी यांच्या हस्ते विद्यापीठापिठाने नवी दिल्ली येथे आयोजित शानदार दीक्षांत समारंभात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बी. सिंग अभिनेत्री दिया मिर्झा यांची उपस्थिती होती.

वर्ल्ड पिस ऑफ युनायटेड नेशन्स यूनिवर्सिटी ही अभिमत विद्यापीठ असून युनायटेड स्टेसस ऑफ अमेरिका, स्टेट ऑफ कोलोरॅडोची मान्यताप्राप्त आहे.

शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास अशा विविध विषयावर पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधलकी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून दिलेल्या योगदानाबद्दल ही पदवी देण्यात आलीय.