उत्तर सोलापूर/कय्युम जमादार :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय एटीएसइ परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलंय. शाळेतील इयत्ता सातवीतील अपूर्वा गोरोबा कांबळे केंद्रात दुसरी तर जिल्हा ३८ वी आणि राज्यात ४५ वी आलीय. कु. संस्कृती विश्वास पवार ही केंद्रात ४ थी जिल्ह्यात ४४ वी आणि राज्यात ५१ वी आलीय. या यशाबद्दल शालेय समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी वर्ग शिक्षिका डॉ. माधुरी भोसले आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय.
त्याचबरोबर इयत्ता सातवीतील आर्या अमोल पवार ही केंद्रात ४ थी जिल्हा ४४ वी आणि राज्यात ५१ वी आलीय. याच वर्गातील कु. सायली पांडुरंग गोडसे, प्रिया भास्कर बोराडे, ऋतुराज बबन कांबळे, सई सतीश गंजे, हर्षदा बाबासाहेब निकम, आर्यन रघुनाथ शिरसट, आदर्श गोरोबा कांबळे, पूनम सोमनाथ पाटोळे या विद्यार्थ्यांनीही उत्तम गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केलीय. या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका डॉ. माधुरी भोसले यांचं मार्गदर्शन लाभले.
अपूर्वा गोरोबा कांबळे - 192
आर्या अमोल पवार. - 180
संस्कृती विश्वास पवार - 180
सायली पांडुरंग गोडसे - 178
प्रिया भास्कर बोराडे. - 174
ऋतुराज बबन कांबळे- 168
सई सतीश गंजे - 154
हर्षदा बाबासाहेब निकम - 152
आर्यन रघुनाथ शिरसट - 148
आदर्श गोरोबा कांबळे- 144
पुनम सोमनाथ पाटोळे- 128
सर्व यशस्वी विद्यार्थी व वर्गशिक्षिका डॉ. माधुरी भोसले मॅडम यांचं अभिनंदन केले जात आहे.