Type Here to Get Search Results !

बसव सप्ताहाचे आयोजन; समाज बांधवांकडून सहकार्याची अपेक्षा : शिवानंद सावळगी



सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेबरोबरच इतर अनेक उपक्रम घेऊन बसव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमास समाजबांधवांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी अपेक्षा शिवानंद सावळगी यांनी व्यक्त केलीय. 

जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, २८ एप्रिल रोजी सकाळी भुसार गल्ली येथील श्री मन्मथेश्वर मंदिर येथे वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात वीरशैव व्हिजनच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शिवानंद सावळगी तर सचिवपदी राहुल बिराजदार यांची निवड करण्यात आलीय. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष शिवानंद सावळगी बोलत होते.

नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सहसचिव बसवराज जमखंडी, कोषाध्यक्ष श्रीमंत मेरू, सहकोषाध्यक्ष गंगाधर झुरळे, कार्याध्यक्ष मनोज पाटील, सोमनाथ चौधरी, व्याख्यानमाला प्रमुख प्रा. मलकप्पा बणजगोळे, प्रा. महेश कोटीवाले, प्रसिद्धीप्रमुख गौरीशंकर अतनुरे, सिद्धेश्वर कोरे, स्पर्धा प्रमुख प्रा. शिव कलशेट्टी, मेहुल भुरे, सांस्कृतिक प्रमुख संतोष अंकद, बसवराज चाकाई, सोशल मीडिया प्रमुख चेतन लिगाडे, अमोल कोटगोंडे, पूजा प्रमुख मेघराज स्वामी, संतोष स्वामी, कार्यक्रम प्रमुख गणेश घाळे, केतन अंबुलगे, प्रवक्ता विनायक दुदगी, सल्लागारपदी आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, राहुल शेटे, राजेश नीला, विजयकुमार बिराजदार, नागेश गदगे, संगमेश कंठी, दिपक बडदाळ, महेश विभुते आणि बापू जाधव यांची निवड करण्यात आली.

बैठकीचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन सोमेश्वर याबाजी यांनी तर राहुल बिराजदार यांनी उपस्थितांचं मानले.