सोलापूर : शहर गुन्हे शाखेचे सपोनि जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथकाने ०२ विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी जेलरोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडे दाखल ०३ गुन्हे केले असल्याची माहिती दिली. त्यानंतर, त्यांच्याकडून या गुन्ह्यात चोरीस गेलेले DVR, रोख रक्कम, ०४ मोबाईल फोन व एक टॅब असा एकुण ५६,२६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रात्रीच्या सुमारास, रघोजी ट्रान्सपोर्ट येथून ०१ टॅब, एकलव्य करिअर अॅकॅडमी येथून ०२ मोबाईल फोन, एस.बी.आय. कॉलनी येथून, ०१ मोबाईल फोन चोरीस गेले होते. यासंबंधी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडं भा.द.वि.क.३८० अन्वये गुन्हा दाखल असून ही घटना २२ मार्च २०२४ रोजी घडली होती.
त्याचपमाणे मार्केट यार्ड, सोलापूर समोरील दुकान गाळ्याचे शटर उचकटून ०२ मोबाईलची २५ मार्च रोजी चोरी झाली होती. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडं भा.द.वि.क.३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच २८ मार्च रोजी मार्केट यार्ड सोलापूर येथे भुसार गाळ्याचे शटर उचकटून, दुकानातील रोख रक्कम व HIK VISION कंपनीचा DVR चोरीस गेल्याची नोंद जेलरोड पोलीस ठाण्याकडं भा.दं.वि.सं. कलम ४५४, ४५७, ३८० झालीय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, रत्ना सोनवणे, सतिश काटे आणि सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिन्द्र राठोड यांनी पार पाडली.