सोलापूर : रमजान ईद अर्थात 'ईद उल फित्र' चं मंगळवारी, ०९ एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झालं नाही. त्यामुळे रमजानचा ३० वा अंतिम रोजा बुधवारी होत आहे. सायंकाळी चंद्र दर्शन होऊन गुरुवारी, ११ एप्रिल रोजी ईदची नमाज होईल, असं शहर काझी अमजद अली सय्यद यांनी मंगळवारी सायंकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हटलंय.
सोलापुरातील ईदगाहचे वेळ - रंगभवन ईदगाह - सकाळी ठीक ०७:३० वाजता, पानगल हायस्कूल व होटगी रोड - सकाळी ठीक ०८:३० वाजता तसेच जुनी मिल कंपाऊंड - सकाळी ठीक ०९:३० वाजता रमजान ईदची नमाज अदा करण्यात येईल, असं शहर काझींनी यापूर्वीच एका प्रसिध्दी पत्रकान्वये यापूर्वीच सांगितलंय.
या वर्षी आसार मैदान, ईदगाह किल्ला रोड येथे गुरुवारी ११ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वा. रमजान ईदची नमाज अदा होणार आहे, सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावं, असं आवाहन आसार शरीफचे चिफ ट्रस्टी, काझी व खतीब शकील मौलवी यांनी केलंय.