सोलापूर : मुक्या जित्राबांना चारा-पाण्यापासून वंचित वेऊन त्यांना बांधुन ठेवल्याने व कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहन घेऊन जात असताना अशा परिस्थितीत मिळून आल्याने पिकअपसह २ जर्सी गायी पकडण्यात आल्यात. येथील बेगम पेठ यशोधरा हॉस्पिटलच्या बोळात मंगळवारी सकाळी हे वाहन पकडण्यात आलंय. याप्रकरणी रामचंद्र वाघमारे आणि बाबासाहेब वाघमोडे या दोघाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उभयतांच्या ताब्यातून लाखाचा पिकअप आणि २४ हजार रुपये किंमतीच्या ०२ काळ्या जर्सी गायी ताब्यात घेण्यात आल्यात.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोकॉ/ १९०० अमीन यासिन शेख यांनी यशोधरा हॉस्पिटलच्या बोळात एम एच २५ पी ०४७९ क्रमांकाचा पिक-अप दोन काळ्या जर्सी गायींसह पकडला. त्या वाहनात ही जनावरे दाटीवाटीने तसेच त्यांच्या चारापाण्याची कोणतीही सोय न करता बांधलेली होती.
पोलीस कॉन्स्टेबल अमिन शेख यांनी ते वाहन आणि गाई ताब्यात घेऊन चालकासह दोघाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार रामचंद्र वाघमारे आणि बाबासाहेब रामा वाघमोडे, (वय- १९ वर्षे, दोघे रा. तरटगांव, ता. मोहोळ) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र किपींग अॅन्ड मुव्हींग ऑफ कॅटल इन अन अरबन ऐरियाज ऍक्ट १९९५ चे कलम ३,१३,७, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती, असा पोलिसांचा तर्क आहे. सहाय्यक फौजदार काझी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.