Type Here to Get Search Results !

टॉयलेट बाथरुम बांधण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन ये; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर : आपल्याला टॉयलेट बाथरुम बांधण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन ये, नाही तर आम्ही तुला घरात घेणार नाही, नांदविणार नाही असे म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक व मारहाण करून शारीरिक छळ केलाय. ही घटना एमआयडीसी रोड आकाशवाणी केंद्र जवळील नागरी वस्तीत घडलीय. सौ. स्वाती लक्ष्मण परळकर (वय- २५ वर्षे) असं विवाहितेचं नांव आहे. तिच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी ०५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आकाशवाणी केंद्राजवळील रहिवासी सौ. स्वाती परळकर हिस, मे २०१९ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी मिळून किरकोळ कारणावरुन सतत मानसिक व शारिरीक त्रास देवून तुझ्या आई वडिलांनी लग्नात जावईला तुला सोने घातले नाही, आमचा मान पान केला नाही, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करुन अनेक वेळा मारहाण केली. त्यातच पती लक्ष्मण परळकर याने तू माहेरुन टॉयलेट बाथरूम बांधण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला.

याप्रकरणी सौ. स्वाती हिच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तिचा पती लक्ष्मण परळकर, सासू रुक्मीणी, सासरे महादेव परळकर, दिर विष्णु परळकर (सर्व रा. ०५, आकाशवाणी केंद्रजवळ, एमआयडीसी रोड, सोलापूर) आणि शामल पंगुडवाले (रा. अलिबाग) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल नवले या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.