सोलापूर : श्री दिगंबर मुनीनाथ भजनी मंडळाच्या वतीने, पूर्व विभागातील कुचन नगर, भागातील सुशीलअम्मा मठ येथे सुरू असलेल्या, श्री दिगंबर मुनीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मंगळवारी महाआरती व महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
श्री दिगंबर मुनीनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने, पूर्व विभागातील कुचन नगर भागातील सुशीलअम्मा मठ येथे सुरू असलेल्या श्री दिगंबर मुनीनाथ महाराज यांची ४८ व्या पुण्यतिथीनिमित्त गुढीपाडवा ०९ ते १६ एप्रिलदरम्यान काकड आरती, हरी किर्तन, गीता पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन, कीर्तन, गुलालाचे कीर्तन, काला कीर्तन, अन्नदान, विचारदान, विद्यादान, सामुदायिक विवाह, अशा विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या शेवट दिवशी मंगळवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ ह. भ. प. राकेश अण्णम (महाराज), काला कीर्तन , दुपारी १२ वाजता महाआरती, आणि १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सर्व कार्यक्रम ह. भ. प. अनिल कुंजर (महाराज), ह. भ. प. विठ्ठल वल्लभदेशी (महाराज), ह. भ. प . अंजया दुस्सा( महाराज), ह. भ. प. सिद्राम पोला (महाराज), ह. भ. प. मारुती जिंदम (महाराज), ह. भ. प. नरसिंग बिरकुल (महाराज), ह. भ .प. मोहन कुरापटी (महाराज), ह. भ. प. कुमार स्वामी बिटला (महाराज), ह. भ. प. राकेश अण्णम (महाराज) यांच्या मार्गदर्शनाने व भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज), उपाध्यक्ष श्रीनिवासकर कुसुरकर, विष्णू चीलका, नागनाथ कारमपुरी, मुनिनाथ कारमपुरी, रेणुका येरगुंटला, यमुना पिस्का, कौशल्या कुसुरकर, सुनंदा कुसुरकर, कौशल्या कुसुरकर, अनुसया कारमपुरी, दत्तू बाई गंजी, नागार्जुन कुसुरकर, श्रीकांत कुसुरकर, आदींनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
फोटोओळ : श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त, महाआरती करताना राकेश आण्णम महाराज, व भाविक भक्तगण छायाचित्रात मोठ्या संख्येने दिसत आहेत.