उमरगा : तालुक्यातील कवठा येथील दयानंद विद्यालयाची विद्यार्थीनी कु. अनुष्का मुकेश सोनवणे (इयत्ता-पाचवी) तसेच रुद्राक्ष बालाजी सुरवसे (इयत्ता- पाचवी) या ०२ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूरसाठी निवड झालीय.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी मार्च २०२४ मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी गणित बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान या विषयांचा अभ्यास हे विद्यार्थी सतत करत होते. त्यामुळे सदर परीक्षेमध्ये त्यांना उत्तुंग यश मिळालेलं आहे.
या यशाबद्दल उमरगा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, नारंगवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक सुतार, दयानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक पितांबर कांबळे व सर्व शिक्षक, कवठा गावचे उपसरपंच विकास पाटील, डॉ. रवींद्र सोनवणे, प्रा. सत्यशील सावंत, श्री क्लासेस कवठा चे संचालक अतुल सोनवणे, गुलाब भोसले, प्रशांत सोनवणे यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.