सोलापूर : यंदाच्या कडक उन्हाळ्यात लहान व मोठ्याचे रोजे दरम्यान प्रचंड जिकेरीचे झाले. अशातही सोलापूर शहरातील सुमैय्या सोसायटी नई जिदंगी येथील राहणारा अवघ्या सहा वर्षांचा अरशद शाहफैसल पठाण याने रमजानचे पूर्ण तीस रोजे पूर्ण केले. अरशद दररोज नित्याने पहाटे सहेरीसाठी उठत असत. त्यानंतर दिवसात पाच वेळची नमाज व अल्लाहची अफाट भक्ती करत पवित्र रमजान महीन्यात मोठ्या भक्ती-भावाने अल्लाहची ईबादत करत पूर्ण तिस रोजे केल्यानं कुटूंबात, परिसरात, व समाजात अरशद पठाणचा मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
भल्या-भल्यांना अवघड जात असलेले रोजे पूर्ण करण्यात यंदाच्या उन्हाळ्यात तीस रोजे पूर्ण करण्यास अरशदने बाजीच मारली. अरशदची चर्चा नई जिदगी भागात रंगत आहे, तर अनेकांनी अरशद चं तोडं भरून कौतूक केलं जात आहे. अनेकांनी तर अरशद ला पाहून अल्लाहच्या भक्तीमुळे अरशद झाला महान हेच वाक्य निघत आहे.