Type Here to Get Search Results !

महिला विडी कामगार महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठिशी : विष्णु कारमपुरी


सोलापूर : शिवसेना प्रणित, महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, सोलापुरातील बिडी कारखान्यात प्रचार मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत सोलापूर शहरातील विविध विडी कंपनीतील ब्रांचेसमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचे आवाहन कामगार नेते विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी केले. त्यावेळी सर्वच विडी कंपनीतील कामगारांनी प्रणिती शिंदे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दुसऱ्या टप्प्यात २७ एप्रिल ते ०३ मे अशी प्रचार मोहीम सुरू करण्यात आलीय. या अंतर्गत आज सकाळी ०९:०० ते १२:०० वाजेपर्यंत सुमारे ०८ ब्रांचेसना भेटून, प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आलंय. त्यावेळी सर्व विडी कामगार महिलांनी त्यांचा निर्धार व्यक्त केला.



विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली विडी कारखान्यात प्रचार मोहीम अभियान यशस्वी करण्यासाठी कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, रेखा आडकी, मीरा लच्छुवाले, लक्ष्मी ईप्पा, पप्पू शेख, रमेश चिलबेरी आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ 

सोलापूर : महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ, विडी कारखान्यात करण्यात आलेल्या मोहिमेत, विडी कामगारांशी संवाद साधताना विष्णू कारमपुरी आणि कामगार सेनेचे पदाधिकारी दिसत आहेत.