(राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सन्मान स्वीकारताना डॉ. झहीर काझी)
सोलापूर : मुंबईतील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था, अंजुमने इस्लामचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
गेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, भारत सरकारने साहित्य, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील देशाच्या नागरी सन्मान पद्मश्रीसाठी त्यांचे नाव जाहीर केले होते. राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये आयोजित एका भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान केला.
डॉ. झहीर काझी म्हणाले होते की, हा पुरस्कार केवळ वैयक्तिक पुरस्कार नाही. अंजुमने इस्लाम हे गेल्या १५० वर्षांपासून केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तमरित्या काम केलेल्या सामूहिक प्रयत्नांची ओळख आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर अंजुमने अंजुमने इस्लाम, मुंबईचे सदस्य व सोलापूरचे को-ऑर्डिनेट रियाज पीरजादे व त्यांच्या सहकार्याने त्यांचं अभिनंदन केलं आहे.