Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलाचं अपहरण


सोलापूर : अमिष दाखवून अल्पवयीन मुलाचं अपहरण करण्यात आलंय. खळबळ जनक प्रकार जुना पुना नाका अॅम्बेसेडर हॉटेलजवळ २४ एप्रिल च्या सकाळी घडलाय. सुयश मनोहर चवरे असं अपहृत मुलाचं नांव असून याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे बाणेगांव येथील सुयश हा साडे सतरा वर्षीय मुलगा त्याच्या कामानिमित्ताने चुलत भाऊ धम्मदीप दगडू चवरे याच्याबरोबर जुना पुना नाका चौकात आला होता. भाऊ धम्मदीप याने त्यास तेथे सोडून गेल्यावर त्यास कोणीतरी कशाचं तरी आमिष दाखवून खुश लावून पळवून नेलंय.

 याप्रकरणी मनोहर संदीपान चवरे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर भा.द.वि. कलम ३६३ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अपहृत मुलाचं नाव सुयश असून त्याचा रंग काळा सावळा, शरीर बांधा सडपातळ, उंची साधारणतः पाच फूट, बोलीभाषा मराठी, अंगावर नेसणेस पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे, अशी माहिती पोना/१४२२ एम.आर. ढोबळे यांनी दिलीय.