Type Here to Get Search Results !

आचारसंहिता कालावधी; विभागीय महिला लोकशाही दिन रद्द



पुणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महिला व बालविकास विभागामार्फत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा पुणे विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त संजय माने यांनी दिलीय.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने एप्रिल व मे महिन्याचा विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नसल्याचे माने यांनी कळविलं आहे.