सोलापूर : गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपाचे खासदार असल्यामुळे सोलापूर विकासापासून वीस वर्षे मागे पडला आहे. जुळे सोलापूर हद्दवाढ भागामध्ये कोणत्याही विकासाचे काम मागील दोन्ही खासदारांनी केले नाहीत. सोलापूर शहर हद्दवाढ भागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेत पाठवा, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
प्रभाग क्रमांक २५ हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, विमानतळ परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक मातोश्री सिद्धवाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांपुढे आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, काँग्रेसचे नितीन भोपळे, युवा सेनेचे शहर प्रमुख राम कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सचिवा गौरा कोरे, ज्येष्ठ नागरिक सोनार मामा, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वरमठ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सुधाकर कोरे, उत्तर सोलापूर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष पाटील, शहर महिला काँग्रेसच्या सचिवा वर्षा अतनुरे, सुनिता राजपूत, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज खंदारे, शंकर नगर येथील महिला बचत गटाचे प्रमुख गीता वारे, क्रांतीसुर्य संघटनेचे अध्यक्ष महेश आठवले, पीजी ग्रुपचे लक्ष्मण किणीकर, शैलेश शेवगार, नागेश हत्तुरे, पप्पू पाटील, राज हत्तुरे, कोरे वस्तीचे मालक लहू कोरे, इनामदार चाचा, सलीम शेख, रुद्रप्पा कांबळे, बाळू सावंत, अप्पू बिराजदार, ओंकार हत्तुरे, सिद्धार्थ हत्तुरे, संदेश हत्तुरे, रिक्षा संघटनेचे किरण राठोड, राम जाधव, नागेश धुम्मा, गंगाधर कांबळे आदींसह या परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनसोडे सर यांनी केले तर नागेश पडनुरे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.