शिरोळ : शिरोळ तालुक्याचे माजी आमदार डॉ. स्व. अप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दत्त साखर कारखाना कार्यस्थळावरील डॉ. स्व. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अभिवादन केलं.
यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील,जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने-देशमुख,माजी नगरसेवक मुसा डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.