सोलापूर : गौण खनिज कायद्याखाली कारवाई करून बेकायदा वाळू वाहतूकसदराखाली जप्त केलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरटयानं चोरून नेला. ही घटना उत्तर तहसील कार्यालयाच्या परिसरात रविवारी पहाटे ०१ वा. च्या सुमारास घडलीय. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सोलापूर उत्तर तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा वाळू वाहतुकीत गुंतलेला एमएच १२ आर ८६७६ क्रमांकाचा टेंपो गौण खनिज कायद्याखाली कारवाई करीत दोन ब्रास वाळूसह ताब्यात घेऊन उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात वाळूसह आणून लावला होता. रविवारी कार्यालयाच्या सुट्टीचा दिवस असल्याने या संधीचा गैरफायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी वाळू ने भरलेला टेम्पो चोरून नेला.
ही बाब समजल्यावर संतोष विश्वनाथ कांबळे (रा- वसंत विहार, जुना पुना नाका, सोलापूर) यांनी याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात चोरट्याने टेम्पो आणि दोन ब्रास वाळू असा एकूण ०१ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली. पोह/१४०५/गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.