Type Here to Get Search Results !

पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


सोलापूर : बाधीत शेतजमीनीची दुरुस्ती करुन १४ गुंठे शेतजमिनीची ७/१२ उताऱ्यावर नोंद होण्याचा आदेश देण्याकरीता येथील उत्तर तहसिल कार्यालयातील महसुल सहाय्यक अतुल अशोक रणसुभे यांना तक्रारदाराकडं १५ हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वतः स्विकारल्यावरुन एसीबीच्या पथकानं उत्तर तहसिल कार्यालयात गुरूवारी रंगेहात पकडलंय.

सोलापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे बेलाटी येथील तक्रारदाराची १४ गुंठे शेतजमीन बाधीत झाली असून, बाधीत १४ गुंठे शेत जमिनीपैकी ७/१२ उताऱ्यावर ०१.४० आर एवढी शेत जमिनीची नोंद घेण्यात आली होती. सदरची दुरुस्ती होणेकरीता तक्रारदार यांनी तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणात तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथील महसुल सहाय्यक, (वर्ग-३) अतुल अशोक रणसुभे यांनी १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने सोलापूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी एसीबीच्या पथकाने उत्तर तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. 

महसूल सहाय्यक अतुल अशोक रणसूभे यांनी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने उत्तर तहसील कार्यालयात रंगेहात पकडण्यात आलं. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात अतुल अशोक रणसूभे (रा. ब्लॉक नं. ४२, साईसृष्टी, पोतदार इंटरनॅशनल स्कुलच्या बाजूला, राजस्वनगर, सोलापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

ही कारवाई मार्गदर्शन अधिकारी अमोल तांबे (पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि., पुणे), डॉ. शीतल जानवे/खराडे, (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे), पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार (पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर) यांनी उमाकांत महाडिक (पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर), पोलीस अंमलदार पोहेकॉ अतुल घाडगे, पोहेकॉ सलिम मुल्ला, पोना/ स्वामीराव जाधव, चापोह राहुल गायकवाड (सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

.... आवाहन .... 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज, रंगभवन चौक, सोलापूर.

संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in

इ_मेल- www.acbwebmail@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक- १०६४

दुरध्वनी क्रमांक-

०२१७-२३१२६६८

व्हॉटस अॅप क्रमांक- ९९३०९९७७००