सोलापूर/संजय पवार : कुरनूर गावचे सुपुत्र व माजी पं.स. सदस्य, लोकनेते ब्रम्हानंद मोरे आणि पाणीवेस येथील सामाजिक कार्यकर्ते व गामा पैलवान यांचे सुपुत्र कै. ॠतुराज शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने भवानी पेठ, शाहीर वस्ती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १३४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अक्कलकोट पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या हस्ते तर लोकनेते ब्रम्हानंद मोरे यांच्या प्रतिमेस अभिजित शिंदे तर ॠतुराज शिंदे यांच्या प्रतिमेस माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी युवा उद्योजक प्रमोद मोरे, शशी थोरात, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, भाजप शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष संजय टोणपे, शिवालय चे संस्थापक प्रकाश शिंदे, उत्सव अध्यक्ष मोहन चटके, सुरज पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी सांगितले की, कुरनुरचे मोरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक कामांचा ठसा उमटविला होता. कोणताही राजकीय वारसा नसताना सरपंच, पंचायत समिती सदस्य, विरोधी पक्षनेते अशी अनेक पदे त्यांनी भुषवली. त्यावेळी समाजापर्यंत विविध योजना राबविल्या. त्यामुळे आजही ते प्रत्येक नागरिकाच्या मनात आहेत, तर पाणीवेसचे सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज शिंदे यांच्याविषयी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी सांगितले की, कुरनूर व गामा पैलवान यांचे संबंध अनेक वर्षांपासून आहेत.
सामाजिक राजकीय आणि आर्थिक बाबतीत शिंदे परिवारातील सर्व सदस्यांनी आपापल्या परीने योगदान दिले आहे, याबद्दल सर्व सोलापूरला व सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव आहे. यांचाच भाग म्हणून आपणही समाजाचं काही तरी देणं लागतो, म्हणून रक्तदानसारख्या महान दानाने आपण यांना अभिवादन केले, याबद्दल मला गर्व वाटतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, शिवालय चे प्रकाश शिंदे, शिक्षक आघाडीचे मोहन चटके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात १३४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सहकार्य केले. श्री सिद्धेश्वर ब्लड बँकेने रक्त संकलन करून घेतले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महेश पवार, शिवानंद सोलापूरे, यशराज शिंदे, सुरेश रुपनर, सागर चव्हाण, हरिश सिध्दे, स्वराज्य चव्हाण, शिव कलशेट्टी, किरण शिंदे, अमोल कामाणे, अभिजित बिडवे, रोहन म्हमाणे, सिध्दू भुतनाळे, आकाश पुलसे, शशिकांत यादव, ॠतविक नाईकनवरे, संकेत पाटील, सागर कांबळे, शुभम निळ, सुरज वाजपेयी, युवराज माने, स्वप्निल कुलकर्णी, रितेश कदम, बाळू पांढरे, विशाल भालके या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.