सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध मटका चालविणाऱ्या टोळीस तडीपार करण्याचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वये पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार टोळीप्रमुख आकाश राम कामाठी, (वय-२६ वर्षे, रा. खड्डा तालीम, लाल बहादूर शास्त्री नगर, पोटफाडी चौक, सोलापूर) याच्यासह ०७ जणांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अवैध मटका विश्वाला हा मोठा हादरा मानला जातोय.
टोळीप्रमुख आकाश कामाठी व त्याच्या टोळीतील सदस्यांविरुध्द सन २०१९, २०२०, २०२२, २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील टोळीप्रमुख हा त्याचे साथीदारांसह मुंबई व कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहे. सदर इसमांवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलिसांनी तडीपरीचा प्रस्ताव पाठविला होता.
या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन बुधवारी, १७ एप्रिल २०२४ रोजी टोळीतील टोळी प्रमुख
१. आकाश राम कामाठी (वय-२६ वर्षे, रा. खड्डा तालीम, लाल बहादूर शास्त्री नगर, पोटफाडी चौक, सोलापूर)
२. अप्पू उर्फ व्यंकप्पा भिमण्णा रद्दडगी (वय-३० वर्षे, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर)
३. राघवेंद्र बसवराज ममदापूरे (वय-३९ वर्षे, रा.१६८, समरा नगर, सोलापूर)
४. सिद्राम भिमराव बुगडे (वय-४८ वर्षे, रा. ६२, गांधी नगर झोपडपट्टी क्र. ०७, अक्कलकोट रोड, सोलापूर)
५. प्रभाकर कणकय्या बोडा (वय-४६ वर्षे, रा. १६७०, महालक्ष्मी चौक, जुना विडी घरकुल, सोलापूर)
६. अंबादास हणुमंत मांदवाद, वय-५४ वर्षे, रा. ७१८, सागर नगर, मजरेवाडी, सोलापूर,
७. सिध्देश्वर चंद्रशेखर टेंगळे (वय-४६ वर्षे, रा. भारतीय नगर, शांती नगरजवळ, सोलापूर)
यांना सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून ०२ वर्षाकरीता तडीपार केलं आहे. त्यांना तडीपार केल्यानंतर इंडी, विजयपुर, कर्नाटक येथे सोडण्यात आलंय.