Type Here to Get Search Results !

दक्षता अधिकाऱ्यानं स्वीकारली ०४ हजार रुपयांची लाच

 

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळातील सुरक्षा रक्षकाची बदलीची नोटीस रद्द करण्यासाठी ०५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ०४ हजार रुपये स्वीकारले असता, महेंद्र शिवाजीराव टापरे (वय-४५वर्षे) या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी लाचखोर सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे एसीबी, सोलापूर कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को या सुरक्षा एजन्सी अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदावर नोकरीस असून सध्या ते अक्कलकोट बस आघाडीचे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. टापरे यांनी तक्रारदार यांची अक्कलकोट बस डेपोतून बदली करून त्यांच्याऐवजी नवीन सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याबाबत लेखी पत्र (नोटीस) दिली होती. 

त्यामुळे तक्रारदाराने टापरे यांना समक्ष भेटून ती नोटीस रद्द करण्यासंबंधी विनंती केली. त्यावेळी टापरे यांनी त्या सुरक्षा रक्षकाकडं ती नोटीस रद्द करण्याकरिता ५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारल्याप्रकरणी  महेंद्र शिवाजीराव टापरे (पद-सुरक्षा व दक्षता अधिकारी राज्य परिवहन विभाग सोलापूर, वर्ग-२ मुळ रा. सन युनिव्हर्स अपार्टमेंट फ्लॅट नंबर आय ७०१ नरे, पुणे, सध्या रा. शासकीय विश्रामगृह, राज्य परिवहन विभाग, सोलापूर) यांना रंगेहात पकडण्यात आले. 

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाकडे तक्रार आल्यावर पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला होता. त्यात महेंद्र टापरे ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (मो. क्र. 9922100712), अपर पोलिस अधीक्षक डॉ. शितल जानवे/खराडे (मोबाईल क्र. 9921810357) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कार्यालयाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा पथकातील पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोह अतुल घाडगे, पोशि सलीम मुल्ला, चापोशि अक्षय श्रीराम (सर्व नेमणूक : ला.प्र.वि. सोलापूर) यांनी पार पाडली.

 ..... आवाहन ....

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.

                                  (गणेश कुंभार)

सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.

मो.क्र. 9764153999, कार्यालय क्र 0217-2312668

ईमेल dyspacbsolapur@gmail.com, Toll free no 1064