Type Here to Get Search Results !

हरवलेल्या बालकासाठी पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन


सोलापूर : पालवी बालगृह पंढरपूर येथे ०५ डिसेंबर २०१९ रोजी दाखल करण्यात आलेल्या (ऋषी-संस्थेने ठेवलेले नाव) हरवलेल्या मुलाचा ताबा मिळावा,  यासाठी मुलाचे पालकांनी किंवा नातेवाईकांनी ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असं आवाहन  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी केलं आहे.

पालवी बालगृह पंढरपूर किंवा जिल्हा बाल संरक्षण  अधिकारी अतुल वाघमारे (संपर्क क्रमांक 7219104503) अथवा बाल कल्याण समिती जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह व बालगृह, 937/1 नॉर्थ सदर बझार ,सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी केलंय.