Type Here to Get Search Results !

एस. ई. एस. पॉलिटेक्निक येथे महिला हिमोग्लोबिन तपासणी शिबिर; रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान


सोलापूर  : "बेटी बचाओ-बेटी पढाओ-राष्ट्र जगाओ"  तसेच सेवा या उपक्रमांतर्गत भारत विकास परिषद, सोलापूर व डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने  आणि एस. ई.एस. पॉलिटेक्निक महिला कमिटी  यांच्या सहकार्याने एस. ई. एस. पॉलिटेक्निक येथे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. सुमारे २०३ विद्यार्थिनींची यावेळी हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली, ४० जणांनी यावेळेस रक्तदान केले. काही विद्यार्थिनींनी प्रथमच रक्तदान केले. 

दोन्ही शिबिरास विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या विद्यार्थिनींना आरोग्य व आहारविषयक समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे अध्यक्ष जितेश कुलकर्णी , डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे  संचालक मिलिंद फडके, एस. ई. एस. पॉलिटेक्निक चे प्राचार्य अतुल भावटणकर, कॉलेजच्या जनसंपर्क अधिकारी शुभदा देशपांडे, भारत विकास परिषदेचे जिल्हा संघटक महादेव न्हावकर, ज्येष्ठ सदस्य श्रीकांत कुलकर्णी, सुधीर देव, अविनाश केतकर, महेश साठे, रविंद्र नाशिककर उपस्थित होते. 


प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर  सर्व मान्यवरांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य भावटणकर व शुभदा देशपांडे यांनी एस. ई. एस. पॉलिटेक्निक ने वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. 

जितेश कुलकर्णी यांनी भारत विकास परिषद व त्यांचे कार्य  तसेच घेण्यात येणाऱ्या महिला हिमोग्लोबीन तपासणी व रक्तदान शिबिर याबद्दल माहिती दिली. हेडगेवार रक्तपेढीचे मिलिंद फडके यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रमसिंह बायस व आभार प्रदर्शन प्रा.श्रीलता जन्नु  यांनी केले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सुरुवात व राष्ट्रगीताने  सांगता करण्यात आली. 

शिबिर सकाळी १०.३० ते दुपारी ०३ वा. पर्यंत घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एस. ई. एस. पॉलीटेक्निकचे प्रा. पद्मावती नागणसुरे, प्रा. महेश पाटील, प्रा. निलेश एखंडे, प्रा. अजय पाटील व कॉलेज मधील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.