Type Here to Get Search Results !

बुधवारी ०१ लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते दृश्य प्रणालीद्वारे सवलत कर्जाचं वाटप


सोलापूर : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ अशा तीन महामंडळामार्फत देशातील एक लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृश्य प्रणालीद्वारे बुधवारी, १३ मार्च रोजी सवलत कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दुपारी १२.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत नियोजन भवन येथे दृष्य प्रणालीव्दारे पार पाडण्यात येणार असून, कार्यक्रमात दृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री लाभार्थ्याची संवाद साधणार आहेत.  कार्यक्रमास सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री, भारत सरकार रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलीय.