Type Here to Get Search Results !

घरफोडी, जबरी चोरी व मंदिर चोरीतील गुन्हेगार एमपीडीए अन्वये स्थानबध्द



सोलापूर : जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, विनायक दत्तात्रय नारबंडी (वय ३० वर्षे, रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन जबरी चोरी, घरफोडी, दुखापत करणे, खंडणी मागणे आणि धमकी देणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आला आहे. त्याच्याविरुध्द गंभीर स्वरूपाचे १३ गुन्हे पोलीस आयुक्तालयाच्या दफ्तरी दाखल आहेत. त्यास गुरूवारी एमपीडीए अन्वये स्थानबद्ध करण्यात आले.

त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. विनायक दत्तात्रय नारबंडी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत. विनायक नारबंडी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी गतवर्षी क.११० सीआर.पी.सी. प्रमाणे कारवाई करण्यात आली होती. 

त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी गुरुवारी, २९ फेब्रुवारी रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास त्याच दिवशी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०१) अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोउपनि विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ ८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ १२५४ सुदीप शिंदे, पोशि १९१६ अक्षय जाधव, पोशि ६५४ विशाल नवले यांनी केली.