दक्षिण सोलापूर (ग्रामीण) चे निरीक्षक बदलणार
सोलापूर : जिल्ह्यातील माढा, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय माहिती घेऊन काँग्रेस पक्षाचे संघटना मजबूत करण्यासाठी बुथ मंडल सक्षम करा, असं आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राच्या सह प्रभारी सोनलबेन पटेल यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील काँग्रेस भवनात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे सह प्रभारी सोनलबेन पटेल यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
काँग्रेस पक्षाच्या बैठकीस गैरहजर राहणे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून वेळोवेळी आलेले आदेश पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत त्यांनी यावेळी दिले. दक्षिण सोलापूर (ग्रामीण)चे निरीक्षक बदलणार येणार आहेत. यापुढे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सुचित केले.
सोलापूर जिल्ह्यातील १६ ब्लॉक, ५ शहरांची बुथ वाईज माहिती जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिली. लवकरच सोलापुरातील सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती हत्तुरे यांनी दिली.
या प्रसंगी माजी आमदार धनाजी साठे, वरिष्ठ उपाध्यक्ष भिमाशंकर जमादार, अशपाक बळोरगी, माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, दादा साठे, राधाकृष्ण पाटील, मल्लेशी बिडवे, राजकुमार पाटील, मुन्ना हरणमारे, जिल्हा संघटक रमेश हसापुरे, जिल्हा सरचिटणीस भिमराव बाळगे, भारत जाधव ,पंढरपूर तालुका अध्यक्ष हणमंत मोरे, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष शालीवान माने, सांगोला तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सुर्यवंशी, अक्कलकोटचे हडलगी, भटक्या विमुक्त सेलचे मोतीराम चव्हाण, निराधार सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश हावळे, श्रीशैल रणखांबे,अमोल म्हमाणे, मोहोळ अध्यक्ष किशोर पवार, काकासाहेब बंडगर, सौदागर जाधव आदी उपस्थित होते.