भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थी आणि महिलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा आर्यन्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा निर्णय

shivrajya patra

उत्सव अध्यक्ष झिशान सय्यद तर सचिवपदी आदित्य जाधव

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय आर्यन्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने ठरविले गेले. विद्यार्थी आणि महिलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अमित अजनाळकर यांनी केले.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आर्यन्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड व नियोजन बैठक अंत्रोळीकर नगरातील प्रगती लॉन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थापक अमित अजनाळकर बोलत होते.


याप्रसंगी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस प्रारंभ झाला. आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांनी आपले जीवन वाहून घेतलेले सोलापूरचे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत कालकथीत विठ्ठल पाथरुट यांचं नुकतेच निधन झाले. त्यांना या बैठकीत श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुन्ना कलबुर्गी, तौफिक शेख (पैलवान), मोहसीन शेख, अॅड. अखिल शाक्य, यशवंत पाथरुट, अजय प्रक्षाळे, पंकज क्षीरसागर, दिनेश गवळी, सिकंदर मुजावर, किशोर गायकवाड, प्रदीप बाळशंकर आदींची उपस्थिती होती.



त्यानंतर पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. उत्सव कार्यकारिणीत, उत्सव अध्यक्ष झिशान सय्यद, उपाध्यक्ष- विशाल बसवा, आदित्य जाधव (सचिव), लक्ष्मण कटारे (सहसचिव), तावेश मोहोळकर (खजिनदार), अजिंक्य गायकवाड (सह खजिनदार), इरफान मैंदर्गी (मिरवणूक प्रमुख), अमोल भोसले (मीडिया प्रमुख) तर शुभम चव्हाण, सलमान कंपली, शकील शेख, अक्षय गायकवाड, आकाश आहेरकर, शुभम भालेकर, सागर कट्टीमनी आणि ऋषिकेश आखाडे यांची संयोजन सदस्यपदी निवड करण्यात आली.

मार्गदर्शक म्हणून अमित अजनाळकर, मोहसीन शेख, अॅड. अखिल शाक्य, अजय प्रक्षाळे यांच्यावर मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलीय तर सल्लागार समितीत कीर्तिपाल शिवशरण,यशवंत पाथरुट, अजय सिंग, पंकज क्षीरसागर, अॅड. दर्शना गायकवाड, सिराज खान, महेश धनवाणी, शशी गायकवाड यांचा समावेश आहे.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम भालेकर, अजिंक्य गायकवाड, अमोल भोसले, आकाश आहेरकर, सागर कट्टीमनी, आदित्य जाधव, शुभम दावणे, सुजित ओगे, मनोज जानराव आदींनी परिश्रम घेतले.

To Top