सोलापूर : अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौक येथे, वाहतूक सिग्नल बसवावा, अशी मागणी करत, शिवसेने ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्याची दखल घेऊन शुक्रवारी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले.
सोलापूर ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग बनविताना, गांधीनगर लक्ष्मी मंदिर येथे, बोगदा करणे गरजेचे होते, ते न केल्याने महालक्ष्मी चौकात अपघाताची मालिका सुरू झाली, म्हणून महालक्ष्मी चौक येथे सिग्नल बसवावे, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, विविध प्रकारचे तीव्र आंदोलने करण्यात आले.
त्याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभाग, यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी, ०१ मार्च रोजी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त कारंजे, व अतिरिक्त उपायुक्त मोरे यांच्या शुभहस्ते व विष्णू कारमपुरी, शिवा ढोकळे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, दीपक दुधाळ, वाहतूक पोलीस कर्मचारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्युत बटन दाबून सिग्नल सुरू करण्यात आले. यावेळी विष्णू कारमपुरी यांनी महामार्ग अधिकारी, महापालिका अधिकारी व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचं आभार मानले.
***
छायाचित्रात अक्कलकोट रोडवरील श्री महालक्ष्मी चौक येथे विद्युत सिग्नल उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सोमपा अतिरिक्त आयुक्त कारंजे, उपायुक्त मोरे, विष्णू कारमपुरी, वाहतूक पोलीस कर्मचारी आणि इतर मान्यवर दिसत आहेत.