सोलापूर : येथील भारतरत्न इंदिरा नगरातील रहिवासी महेश नागनाथ भिमनपल्ली यांची एस. एस. मोबाईल शॉपी समोर पार्क केलेली एम.एच.१३ सी.एम.३२०४ क्रमांकाची मोटारसायकल अज्ञात चोरून नेली. ही घटना २१ डिसेंबर २०२३ रोजी सायकांळी घडली. त्यांच्या तक्रारीवरुन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भादविसं कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यास अटक अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून ७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्यामधील अज्ञात चोरटयाचा शोध घेत असताना २८ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार एक ३० ते ३५ वर्षीय तरुण चोरीची मोटार सायकल घेऊन बाळे ब्रीजखाली येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्या ठिकाणी जाऊन त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याचं नांव सिद्राम ऊर्फ रामा बसप्पा वाघमारे (वय-३६ वर्षे, रा. रघोजी हास्पीटलसमोर, कोनापुरे चाळ, फॉरेस्ट, सोलापूर) असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यास मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
त्यानंतर त्याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता, त्याने आणखी ०६ चोरीच्या मोटार सायकल काढून दिल्याने त्या जप्त करून फौजदार चावडी पोलीस ठाणे, सदरबझार पोलीस ठाणे, औसा पोलीस ठाणे लातूर, तालुका पोलीस ठाणे, वेळापूर पोलीस ठाणे, पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकल अटक आरोपीच्या ताब्यातुन जप्त केल्या. असे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणुन ०७ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत ३.७० लाख रुपये आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा.पोलीस (आयुक्त विभाग -१) अशोक तोरडमल, वपोनि दिलीप शिंदे, दुपोनि विकास देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोह प्रविण चुंगे, पोह अजय पाडवी, पोना आयाज बागलकोटे, पोकॉ कृष्णा बडुरे, पोकॉ विनोद व्हटकर, पोकॉ विनोद पुजारी, पोकॉ अमोल खरटमल, पोकॉ नितीन मोरे, पोकॉ अर्जुन गायकवाड, पोकॉ शशीकांत दराडे, पोकॉ सचिनकुमार लवटे, पोकॉ/अजय चव्हाण, पोकॉ सुधाकर माने, पोकॉ पंकज घाडगे, पोना भिमदे, पोकॉ अतिश पाटील, पोकॉ तौसिफ शेख, यांनी पार पाडली.