Type Here to Get Search Results !

हिंदीचा प्रचार व प्रसारासाठी ‘राजभाषा हिंदी’ कार्यशाळेची गरज : एनटीपीसी’ चे मुख्य महाव्यवस्थापक बंदोपाध्याय


 


सोलापूर एनटीपीसीच्या १५ व्या स्थापना दिवसानिमित केंद्रीय अधिकाऱ्यांची पार पडली ‘हिंदी’ कार्यशाळा


सोलापूर  :  भारतीय राज्यघटनेच्या कलम १७ मध्ये हिंदीचा विशेषत: अधिकृत उद्देशाची मुख्य भाषा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग यांच्याकडून वेळोवेळी त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना निर्गमित केल्या जातात आणि त्यांचे पालन करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. जास्तीत जास्त कार्यालयीन कामकाज हिंदीतून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदीमध्ये काम करण्याचा संकोच दूर करण्यासाठी आणि हिंदीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने ‘राजभाषा हिंदी’ ची कार्यशाळा नियमित आयोजित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘एनटीपीसी’चे मुख्य महाव्यवस्थापक तपनकुमार बंदोपाध्याय यांनी केले.

राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र सोलापूर (एनटीपीसी) यांच्या १५ व्या स्थापना दिनानिमित केंद्रिय कार्यालातील विभाग प्रमुख, राजभाषा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विद्युत केंद्राच्या क्षेत्रीय शिक्षण संस्थान, सम्मेलन कक्ष येथे ‘राजभाषा हिंदी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री  बंदोपाध्याय बोलत होते. 



नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे अध्यक्ष संजय वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी एनटीपीसीचे महाव्यवस्थापक नवीनकुमार अरोडा, परिमल कुमार मिश्रा, महाव्यवस्थापक सूर्य नारायण मूर्ती वाडापल्ली, मानव संसाधन विभाग प्रमुख मनोरंजन सारंगी,  क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन व हिंदी विभाग) अतरसिंग गौतम यांनी कार्यशाळेत ‘व्यक्तिगत जीवन में राजभाषा हिंदी का उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशाविरुध्द लढण्यासाठी आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जाणीव जागृती करण्यामध्ये हिंदी भाषेची महत्वपूर्ण भूमिका होती. त्याकाळी सर्व राष्ट्रीय आंदोलन आणि राष्ट्रीय नेते तसेच स्वातंत्र्यसैनिकानी हिंदी ही संपर्कभाषा म्हणून उपयोगात आली होती, असं प्रारंभी म्हटले. 

यावेळी बोलताना, संपूर्ण विश्वातील भाषांमध्ये हिंदी अग्रेसर भाषा असून जगात तिचा दुसरा क्रमांक आहे. भारतीय संविधानमध्ये राष्ट्रभाषा हिंदीचे केंद्रिय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम आणि राष्ट्रीय बँका यांच्या प्रशासकीय आणि दैनंदिन कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर आणि अंमलबजावणी करण्यासंदर्भात अनुच्छेद नियम ३४३ ते ३५१ या कलमामध्ये विस्तृत माहिती दिली आहे, असेही गौतम यांनी सांगितले.



बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे राजभाषा अधिकारी राजेश कारंडे यांनी ‘राजभाषा हिंदी का कार्यालय एवं व्यवाहरिक संचालन’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, सर्व केंद्रीय कार्यालयामध्ये नियमित हिंदी भाषेचा प्रगती अहवाल तिमाही, सहामाही आणि वार्षिक अहवाल स्वरूपात पाठवणे, कार्यालयामध्ये विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली तिमाही बैठक घेतली पाहिजे. कार्यालयीन बोर्ड, रबरी शिक्के, नाम फलक, आदेश, निविदा आणि प्रशासकीय पत्रामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये असावे. 

दरवर्षी केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये राजभाषा हिंदीच्या प्रगतीचा आढावा लोकसभेचे २० आणि राज्यसभेचे १० खासदारांच्या समितीकडून पाहणी करण्यात येत असते. कार्यालयीन कामात हिंदी भाषेच्या वापरात येणाऱ्या समस्या आणि मार्गदर्शन करण्याकरिता भारत सरकार गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात नगर राजभाषा कार्यान्वयन समिती गठीत केलेली असते. तसेच हिंदीतील पत्रव्यवहाराबाबत देखील कारंडे यांनी मार्गदर्शन केले.



यावेळी संजय वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी दीप्ती यादव यांनी केले तर नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे सदस्य सचिव श्रीराम जावरे यांनी आभार मानले.

एनटीपीसी सोलापूरच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून विद्युत केंद्राच्या परिसरामध्ये हिंदी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व अधिकाऱ्याकडून वड, आंबा, चिंच, फणस, पिंपळ, कडूनिंब सारख्या दाट सावली, भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या विषारी वायू शोषून घेणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 



या कार्यशाळेला एनटीपीसीचे रश्मी राजवाडे, केंद्रिय संचार ब्यूरोचे अंबादास यादव, जे. एम. हन्नुरे, आकाशवाणी केंद्राचे सहायक संचालक अर्चिता ढेरे, सहायक अभियंता सुनील परळीकर, प्रसारण अधिकारी डॉ. सोमेश्वर पाटील, सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अनुवादक मुश्ताक शेख, कनिष्ठ अनुवादक शिव यादव, सहायक अनुवादक राजीव वाडीकर, केंद्रिय जल आयोगाचे शितल काळे, रबी ज्वारी संशोधन केंद्राचे राजभाषा अधिकारी डॉ. परशुराम पात्रोटी, शास्त्रज्ञ डॉ. बसवराज रायगोंडा, केंद्रिय भविष्य निर्वाह संस्थेचे प्रवर्तन अधिकारी शुभम डेरे, एलआयसीचे सहायक प्रशासकीय अधिकारी कुमार देढे, युनाइटेड इंडिया इंशुरेंसचे सहायक व्यवस्थापक महेश कोट्माले, एच. पी. लगड, ओरिएन्टल इन्शुरन्सचे सहायक व्यवस्थापक मिलिंद ठाकरे यांच्यासह एनटीपीसीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.