सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सालाबादप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये यंदाही पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रिडा स्पर्धा, २४ आणि २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात दक्षिण सोलापूर पंचायत समितीतर्फे टेबल टेनिस या खेळात एकेरीत व दुहेरीत वळसंग उर्दू शाळेचे शिक्षक सिराजअहमद शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटशिक्षण अधीकारी श्री मल्हारी बनसोडे साहेब, वळसंग बीटचे शिक्षण विस्तार अधीकारी सनके, वळसंग केंद्राचे केंद्रप्रमुख वाघमोडे, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक समुह, शाळेची व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष मौला कटरे, सदस्य, ग्रामस्थांकडून सिराजअहमद शेख यांचं अभिनंदन करण्यात आलं.
दरवर्षी शेख हे तालुक्याकडुन खेळून उपविजेतेपद पटकावत होते, यंदा त्यानी दक्षिण सोलापूर तालुक्याला एकेरीत व दुहेरीत विजेतेपद मिळवून दिले.